सत्यम पिंगळे यांची राज्यस्तरीय टेनिस स्पर्धकरीता निवड


यवतमाळ जिल्हा टेनिस असो च्या पुढाकारात महाराष्ट्र टेनिस असोशिएशन द्वारे आयोजित अमरावती विभागीय टेनिस स्पर्धेत 17 वर्षे खालील गटात अंतिम सामन्यात सत्यम प्रसाद पिंगळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा खेळाडू मंथन जैन याचा 6-2 ने पराभव केला.ह्या विजया मुळे सत्यम प्रसाद पिंगळे यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धे साठी अमरावती विभागाचे संघात निवड झाली आहे. अमरावती विभागीय टेनिस स्पर्धा जे जे टेनिस क्लब पुसद येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.ह्या स्पर्धे मध्ये अमरावती,अकोला,बुलढाणा,यवतमाळ व वाशीम ह्या पाच जिल्ह्याच्या जिल्हा स्तरीय निवड झालेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.अंतिम सामन्या आधी झालेल्या उपांत्य सामन्यात सत्यम पिंगळे ह्यांनी खामगावच्या अनघ तायडे यांचा 6-0 ने एकतर्फी पराभव केला .चुरशीच्या अंतिम सामन्यात विजयी झाल्यामुळे चि सत्यम प्रसाद पिंगळे यांचे यवतमाळ जिल्हा टेनिस असोसिएशन चे अध्यक्ष शिवबाबू मोर व पदाधिकारी गिरीश टोपरे सर व यवतमाळ जिल्हा टेनिस  संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.सामन्याचे पंच म्हणून विकास आस्वानी पुसद ह्यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments