यवतमाळ : क्षुल्लक कारणावरुन जावायाने कु-हाडीने वार करुन सास-याची हत्या करण्यात
आली. ही खळबळ जनक घटना आज सोमवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी जवाहरनगर भारी येथे
घडली. शहर पोलिसांनी आरोपी जावायाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दिलीप पुरुषोत्तम वाडेकर वय ५५ रा. जवाहरनगर भारी असे मृतकाचे नाव आहे. तर रचिन सतीश झिबलकर वय २७ रा. जवाहरनगर भारी असे मारेकर-याचे नाव आहे. मृतक दिलीप वाडेकर व आरोपी रचिन झिबलकर हे सासरे-जावाई आहे. आज दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला. यावेळी जावाई रचिन याने कु-हाडीने सासरा दिलीप वाडेकर याच्यावर वार करुन त्याची हत्या केली. यावेळी नातेवाईकांनी दिलीप वाडेकर याना कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप बैसाने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, शहर डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम, पोलीस उपनिरीक्षक सुजाता मनवर, डी.ओ. दिक्षीत यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी जावायाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
0 Comments