बस चालक – वाहकांसह
प्रवासांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन
महाराष्ट्र पोलीस मदत केंद्र करंजीच्या वतीने आयोजन
परिवहन मंत्रालयाच्या निर्देशावरुन आयोजन
परिवहन मंत्रालयाचे निर्देशावरुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रमा डॉ. सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस महासंचालक, वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई, यशवंत सोळंके, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर, दीप्ती व्यास, पोलीस निरीक्षक, यवतमाळ, नितीन कोयलवार, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस मदत केंद्र, करंजी यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष राठोड, अंमलदार अनिल जीरकर, नितीन गावंडे, शैलेश जाधव, ज्ञानेश्वर सोयाम, चेतन उगले, नरेश रणखांब, रुपेश लांबाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वाहतुकीचे नियम
१) वाहन चालवितांना नेहमी सिट बेल्टचा वापर करावा. २) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा. ३) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी. ४) दारू पिवून वाहन चालवू नये. ५) वाहन चालवितांना नेहमी वेगमर्यादा चे पालन करावे. ६) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे. ७) गावांमधील रस्त्याने महामार्गावर येते वेळेस व महामार्ग ओलांडत असताना वाहतूक बघून सुरक्षित पणे ओलांडणे. ८)विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये. ९) वाहन चालवतांना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे. १०) समृद्धी महामार्गावर अपघात घडल्यास जखमींना मदत करावी.
0 Comments