बँकेच्या संचालकांची दांडी : जिल्हा मध्यवर्ती बॅक अध्यक्षांवरील अविश्वास बारगळला



यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष मनिष पाटील यांच्यावर राजकीय कुरघोडी करीत अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. आज या अविस्वास प्रस्तावा बाबत बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला सर्व संचालकांनी दांडी मारल्याने सदर प्रस्ताव बारगळला. त्यामुळे जिल्हा मध्यवती बॅकेच्या अध्यक्षपदी मनिष पाटील हे कायम राहणार आहे.

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसापूर्वीच अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. बँकेच्या संचालक मंडळाने प्रस्ताव तयार करुन उपनिबंधकांकडे प्रस्ता दिला होता. त्या प्रस्तावावर आज ३१ जानेवारी रोजी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ऐंन वेळी बँकेच्या संचालकांनीच दांडी मारली. त्यामुळे अध्यक्ष मनिष पाटील यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव बारगळला असून, त्यांचे पद कायम राहणार आहे. यापुर्वीचे अध्यक्ष टिकाराम कोंगारे यांच्यावरही संचालक मंडळाने अविश्‍वास आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोंगारे यांनीही आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता मनिष पाटील यांच्यावरही दबावतंत्राचा प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने अविश्‍वास प्रस्ताव बारगळल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगत आहे.

Post a Comment

0 Comments