विदर्भस्तरीय महिलांची क्रिकेट स्पर्धा : अमरावती ब्लास्टर तर माहेश्वरी सुपर क्वीन

यवतमाळ : डीडब्ल्युएस ग्रृपच्या वतीने तथा अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या वतीने वुमन प्रीमियर लीग सिझन थ्रीचे (विदर्भस्तरीय महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे) आयोजन ५ जानेवारी रोजी इलेव्हन स्टार ग्राउंड येथे केले होते. यामध्ये अमरावती, नेर, वणी या जिल्ह्यातील 8 संघाने सहभाग घेतला होता.  विजेती टीम अमरावती ब्लास्टर आणि माहेश्वरी सुपर क्वीन ठरल्या. अन्य टीम्स होत्या रन रागिनी, पावर ऑफ वूमेन, वूमेन वॉरियर, महाराणी 11, स्वामिनी आणि अग्र नारी. सर्वांनी उत्साहाने या खेळात भाग घेतला आणि आपली प्रतिभा दाखवली. अमरावती ब्लास्टरने सिरीज जिंकून 7000 रुपये आणि ट्रॉफी आपल्या नावे केली. त्याचप्रमाणे माहेश्वरी क्वीनने रनर अप राहून 5000 रुपये आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

वूमेन ऑफ द सिरीज दीपिका बजाज, अमरावती होत्या. बेस्ट फील्डर आणि बेस्ट बॉलर ही उपाधी देखील दिपिका बजाज, अमरावतीने मिळवली. बेस्ट बॅट्समॅन स्नेहा टावरी, यवतमाल होत्या. 8 टीम्सचे एकूण 11 मॅचेस खेळले गेले. 11 मॅचेसमध्ये वूमेन ऑफ द मॅच नेहा केडिया, अग्र नारी टीम, रूपाली बंग, माहेश्वरी क्वीन, मंजू राठी, माहेश्वरी क्वीन, नेहा केडिया, अग्रनारी टीम, स्वाती अग्रवाल, अमरावती ब्लास्टर, पूजा धुर्वे, अमरावती ब्लास्टर ,अनीता वराडे रन रागिनी टीम ,अर्चना बंग अमरावती ब्लास्टर, स्नेहा टावरी माहेश्वरी क्वींस , स्नेहा गिल्डा आणि दीपिका बजाज अमरावती ब्लास्ट यांना देण्यात आले. या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून कल्पना मांगुळकर, डॉ. अंजली गवार्ले पाइल्स हॉस्पिटलच्या संचालिका लाभल्या होत्या. यशस्वीतेसाठी सोनू मेश्राम, कृष्णा करंगडे, राजू चोखानी, रमाकांत मनक्षे, छोटू भैया पांवडे, चंचल झवर, लकीश, तनीषा भांबुरे यांनी सहकार्य केले. या क्रिकेट टुर्नामेंटच्या तांत्रिक कामासाठी दीपक जोशी आणि त्यांच्या टीमने सेवा दिली. संचालन पुनम जयपुरिया यांनी केले. तर आभार अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्ष विमलेश मनक्षे यांनी मानले.

 

Post a Comment

0 Comments