प्रा. नितीन बाराहाते / पांढरकवडा (यवतमाळ)
...................................
गेल्या काही दिवसापूर्वी वणी शहरात गोवंश कत्तल करून झुडपात शेकडो मुंडके सापडल्याने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच पांढरकवडा येथे म आज शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी दुपारी पांढरकवडा शहरात गोवंशाचे अवयव आढळून आले. त्यामुळे पांढरकवडा शहरातील गो प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाढरकवडा शहरातील स्थानिक स्मशान भूमि समोर झुड़पात नगर परिषदेच्या जागेत अतिक्रमण करून तब्बल ८ घरे बांधून ठेवले आहे. त्या घरात गोवंश हत्या करून मासाची विक्री मोटर सायकलने विविध भागात होत होती. कत्तल करण्यात आलेल्या गायीचे अनेक मुंडके खुल्या जागेत झुड़पात फेकून देऊन हाड़ व मास या घरात साठवून ठेवण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता पहापळ रोड वर मोटर सायकलने गोवंश विक्री करीता जात असतांना पोलिसांनी शेख युसुफ शेख अय्यूब कुरेशी व शेख अबूबकर अब्दुल सलाम दोघेही रा पांढरकवडा यास अटक केली. त्याच्याकडून १८ किलो गोवंश मास जप्त केले. तसेच त्यांच्या घराची झड़ती घेऊन १५ किलो गोवंश मास जप्त केले.
बजरंग दलाने दिली माहिती
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सुचना दिली. त्या वरुन पोलिसांनी स्मशान भूमि जवळ असलेल्या अवैध व अतिक्रमण मध्ये असलेल्या ७ ते ८ खोल्या मध्ये शेकडो गोवंशाचे हाड़, मास, कातडी असे अवशेष आढळून आले. त्यामुळे पोलिस प्रशासन सुद्धा चक्रावून गेले. त्यानी तातडीने नगर परिषदला सुचना देऊन सर्व अतिक्रमण जेसीबी अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली आहे. गावात शेकडो गोवंशाचे अवशेष सापडल्याने गावातील हिंदुत्ववादी संघटना संतप्त दिसत होत्या.
कत्तल खाण्याची प्रशासनाला माहितीच नाही
अनेक वर्षा पासुन हे अवैध कत्तलखाने सुरु होते. याची साधी माहिती पोलिस व नगर परिषद प्रशासनास नव्हती काय असा प्रश्न गोप्रेमींनी उपस्थित केला आहे.
गोसेवा आयोगाने दखल घ्यावी
वणी घटने नंतर नागरिक व गोप्रेमी संतप्त झाल्याने गोसेवा आयोगाची राज्य स्तरीय समिति चौकशी साठी वणी मध्ये आली होती त्यानी ठानेदार, मुख्याधिकारी यांची बंद द्वार चर्चा करून त्यांचे बयान नोंदविले होते. आता पांढरकवडा शहरात सुद्धा वणी घटनेची पुनरावृत्ति झाल्याने याची दखल गोसेवा आयोगाने घ्यावी अशी मागणी गो प्रेमी करत आहे.
0 Comments