उमरखेडच्या बसस्थानकावर बॉम्ब!, प्रवाशांसह कर्मचा-यांची तारांबळ

यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथील बसस्थानकावर बॉम्ब असल्याची चर्चा पसरताच प्रवाशांसह कर्मचा-यांची तारांबळ उडाली होती. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यावरुन जिल्हा पोलीस दलाने उमरखेड बसस्थानक गाठुन निर्मनुष्य करण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाव्दारे संपुर्ण घटनास्थळाची घातपातविरोधी तपासणी करण्यात आली. सदर बॉम्ब असलेल्या बॅगला बस स्थानकासमोरील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन सदर बाँम्ब हा डिफ्युज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करुन निकामी करण्यात आला.

उमरखेड येथील बस स्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात ईसमाने घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे अशी माहीती पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे मिळाली होती. यवतमाळ जिल्हयातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळ गाठले. कोणतीही जिवित अथवा वित्त हानी होवु न देता बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाव्दारे संपुर्ण घटनास्थळाची घातपातविरोधी तपासणी करण्यात आली. सदर बॉम्ब असलेल्या बॅगला बस स्थानकासमोरील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन सदर बाँम्ब हा डिफ्युज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करुन निकामी करण्यात आला. त्यानंतर फॉरेन्सीक टिमच्या मार्फतीने घटनास्थळावरील भौतीक पुरावे जप्त करण्यात आले. सदर घटने दरम्यान थांबवुन ठेवलेली रस्त्यावरील गर्दी ही ट्राफिक पोलीसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली. त्यानंतर सदरची कार्यवाही ही पोलीस विभागातर्फेच घेण्यात आलेली एक मॉक ड्रिल असल्याचे मेगा फोनव्दारे नागरिकांना सांगीतले. त्यानंतर प्रवाशी व कर्मचा-यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

यांनी केली मॉक ड्रील

कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, हनुमंत गायकवाड, SDPO, उमरखेड, यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड, सपोनि. सारंग बोम्पीलवार, प्रमुख, दहशतवाद विरोधी शाखा, पोउपनि उल्हास परांडे, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोउपनि संजय धवणे, प्रमुख QRT पथक व RCP पथक, सपोनि रोहीत बेंबरे वाहतुक शाखा, उपविभाग उमरखेड, सपोनि ज्ञानेश्वर मुंडाले अंगुलीमुद्रा विभाग, पोहवा अमित मेश्राम, शा. फोटोग्राफर, वैदयकीय अधिकारी, अग्निशामक दल यांनी केली.

नागरीकांनी प्रसंगावधान राखावे

एखादा बाँम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे. नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे. याबाबत सदर रंगीत तालीमव्दारे प्रात्यक्षीक करुन दर्शविण्यात आले. नागरीकांनी जागरुक राहुन दहशतवादासंबंधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे फो.नं. 07232-242700 व डायल 112 वर संपर्क करुन कळवावे असे आव्हान यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments