यवतमाळ : विधानसभा निवडणूकीत आ. संजय राठोड यांनी दिग्रस विधानसभा
मतदारसंघाचे सगळे रेकॉर्ड मोडत सलग पाचव्यांदा भरघोस मताधिक्याने निवडून आले.
त्यानंतर त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद देवून जलसंधारण खाते
देण्यात आले. एवढेच
नाही तर नुकतेच पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेना
यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने पालकमंत्री ना. संजय राठोड
यांचा जाहीर नागरी सत्कार दि. १९ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम
दारव्हा येथे आयोजीत करण्यात आला होता.
प्रारंभी अहिल्यादेवी होळकर सामाजीक सभागृह ते छत्रपती शिवाजी महाराज
स्टेडियम पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान चौकाचौकात हर्षोल्हासात महीला पुरुषांकडून
राठोड यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेना दारव्हा तालुका व तालुक्यातील अनेक सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय संस्थांतर्फे
संजय राठोड यांचा सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे विशाल जनसमुदायाचे
उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मी होणार सुपरस्टार
फेम बालगायीका स्वरा लाड व सारंग भालकेच्या गितगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यक्रमाला प्रमुख
पाहुणे म्हणून जीवन पाटील, श्रीधर मोहोड
माजी शिक्षण सभापती, डॉ. प्रा. अजय दुबे भारतीय जनता पार्टी, कालींदा पवार माजी अध्यक्ष जिल्हा परीषद, मनोज सिंगी शिवसेना
तालुकाप्रमुख, पराग पिंगळे, तथा शिवसेना व महायुतीचे
पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
सत्काराला उत्तर देताना नामदार संजय राठोड यांनी जनतेने सातत्याने
दिलेल्या प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले. भविष्यात देखील जनहिताची कामे करण्याबाबत जनतेस आश्वस्त केले.
0 Comments