याचिका दाखल करण्यासाठी करणार लोकवर्गणी
स्टुडन्ट वेल्फेअर इंग्रजी माध्यम शाळेच्या बसचां दिनांक 25 रोजी पळशी फाटा
येथे भीषण अपघात झाल्याने त्यात 13 वर्षीय महिमा अप्पाराव सरकाटे हीचे दुर्दैवी निधन झाले. याप्रकरणी दिनांक 28 रोजी शिवसेना (शिंदे
) गटाचे पदाधिकाऱ्यांनी महिमाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी घटना घडल्यानंतर तब्बल सहा
दिवसानंतरही महिमाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या
वतीने महिमाला न्याय मिळवून देण्यासाठी लोक वर्गणीतून उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका
दाखल करणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख
ॲड संजय जाधव यांनी सांगितले.
स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असलेली कु. महिमा
अप्पाराव सरकाटे हिचा दि 25 रोजी झालेल्या स्कूलबस
च्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषी संस्थाचालक
व सर्व संचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा. शाळेची मान्यता रद्द करा या मागणीसाठी पालकांनी शाळेच्या प्रांगणात ठिया आंदोलन केले होते. परंतु प्रशासनाच्या
वतीने कारवाई झाली नाही. संस्थाचालक, संचालकांवर
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा, शाळेची मान्यता रद्द करा अशी याचिका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उच्च न्यायालयात लवकरच दाखल करणार आहे.
याचिका दाखल करण्यासाठी लोकवर्गणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे रवीकांत रुडे, शहर प्रमुख एड. संजय जाधव, अनिल नरवाडे, कैलास कदम, संदीप ठाकरे, बसवेश्वर क्षीरसागर, एड अजय पाईकराव, दामोदर इंगोले, अनंतराज अमृते, विष्णु मत्ते, श्रीनिवास शर्मा, राजू गायकवाड, सपना चौधरी, सारिका बोकांडे, वर्षा वानखेडे, नंदा काळे, ज्योती जोगदंड
यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments