यवतमाळ : शहरातील जय भवानी चौक, भोसा रोड परिसरात
घातक शस्त्र घेवून फिरणा-या युवकास पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाने २५ जानेवारी रोजी ही कारवाई केली.
सरफरोज खान मनवर खान वय २० वर्ष, रा. क्रिष्णा
फॅक्ट्री जवळ, राधिका ले-आऊट, भोसा रोड, यवतमाळ असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. दि. २५ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहरात
विशेष नाकाबंदी माहिमेसंबंधाने पेट्रोलींग करीत होते. अशातच जयभवानी
चौक, भोसा रोड, यवतमाळ परिसरात एक युवक गैरकृत्य करण्याच्या हेतूने सत्तूर
बाळगून फिरत असल्यसाची माहिती मिळाली होती. त्या
आधारे ही कारवाई करण्यात आली. रसफरोज याच्याकडून सत्तूर जप्त
केले केले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कलम ४/२५ भारतीय हत्यार
कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस
अधिकारी, यवतमाळदिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुगत पुंडगे, पोउपनि गजानन
राजमल्लू, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, सै. साजिद, बंडू डांगे, अजय डोळे, योगेश डगवार, रुपेश पाली, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, सलमान शेख, आकाश सहारे, देवेंद्र होले यांनी केली.
0 Comments