‘नंददीप’ला पद्मश्री द्यावा : सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य प. पू. सद्गुरुदास महाराज

 नंददीप दीपक नव्हे तर वनवा : अभिनेत्री डॉ. प्रा. स्मिता देशमुख, प्र. मा. रुईकर ट्रस्ट सेवा पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ : एवढा मोठा माणूस आपल्या विदर्भात आहे हे मला आता माहिती झाले. देव पुजा समजुन नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून संदीप शिंदे व त्यांच्या पत्नीने सेवाव्रत जोपासले आहे. त्यांचे कार्य हे खुप मोठे असून, सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देवून सन्मान करावा. तो पुरस्कार मिळेल तेव्हा मिळेल. आपण छत्रपती सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने दिला जाणारा ४२ वा जिजाउ पुरस्कार संदीप शिंदे यांना जाहिर केल्याची घोषणा करण्यात आली. नागपूरला हा सोहळा थाटामाटात होईल. त्यांची ओळख राज्यात पोहचविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यापुर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह नामवंत लोकांना हा पुरस्कार दिला आहे. असेही सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य प. पू. सद्गुरुदास महाराज यांनी म्हणाले. नांझा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील आप्पासाहेब तत्ववादी सभागृहात आयोजीत पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले विविध सामाजिक क्षेत्रात मदत करणारे तसेच शतकीय वाटचाल केलेल्या प्रल्हाद माधव रुईकर ट्रस्टच्या वतीने २०२५ या वर्षाचा प्रथमरुईकर ट्रस्ट सेवा पुरस्कार सातत्य ठेवून काम करणाऱ्या उत्कृष्ट सामाजिक काम करीत असलेल्या मनोरुग्णांसाठी अहोरात्र झिजणाऱ्या नंददीप फाउंडेशनला पुरस्कार नुकताच जाहिर करण्यात आला होता. आज दि. १४ जानेवारी रोजी नांझा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील आप्पासाहेब तत्ववादी सभागृहात पुरस्कार वितरणाचे आयोजन केले होते. यावेळी नागपूर येथील सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य प. पू. सद्गुरुदास महाराज यांच्या शुभहस्ते, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तथा शिवाजी महाविद्यालय, अमरावती येथील प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्या  हस्ते नंददिप फाउंडेशनचे संदीप शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदय नावलेकर हे होते. रुईकर ट्रस्टचा २०२५ चा प्रथम पुरस्कार निवडण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने बेघर रुग्णाची सेवा करणा-या नंदादीप फाउंडेशनची या पुरस्काराकरिता निवड केली होती.

नंददीप नव्हे तर वनवा

यावेळी जिजाऊ चित्रपटातील अभिनेत्री तथा शिवाजी विद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख म्हणाल्या की, जिथे उनिवा आहे ति पूर्ण करणे म्हणजे सेवा करणे होय. दुसऱ्याच्या डोळ्यातील दुःख निवारण करणे हेच नंदादीप फाउंडेशनचे ध्येय उद्दिष्ट दिसून येत आहे. नंददीप दीपक नव्हे तर वनवा संदीप हा माणसे पेटविणारा असून तो कापूरा प्रमाणे काम करीत असे उद्गार काढले. तसेच मुलांच्या अपेक्षा पूर्ण करताना पालकांना होणारा त्रास या विषयी मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य उदय नावलेकर यांनीही या पुरस्काराची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी  व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे, विश्वस्त कृ. र. उपाख्य दादा गोखले, मुख्याध्यापक आनंद चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 

Post a Comment

0 Comments