पारवा ते अदिलाबाद मार्गावरील घटना
यवतमाळ : राज्यात गोवंश हत्येवर बंदी घातली आहे. त्यामुळे तस्करानी आपला मोर्चा ज्या राज्यात गोहत्या बंदी नाही त्याकडे वळविला आहे. यवतमाळ जिल्ह्यासह नागपूर व अन्य राज्यातून गोवंश कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात पाठविण्यात येत आहे. ट्रकमध्ये जनावरे कोंबुन तस्करी करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज जनावर घेवून जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये पाच जणावरांचा जागीच मृत्यू झाला हे. ही घटना पारवा ते अदिलाबाद मार्गावर आज बुधवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या
पारवा ते पिंपळखुटी अदिलाबाद रोडने ट्क क्रं एम. एच ३१/ एफ सी ४८६१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १९
गोवंश जनावरे घेवून जात होता. अशातच पारवा या गावापासून काही अंतरावर ट्रक चालकाचे
नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात पाच जनावरांचा मृत्यू झाला. तर १४ जनावरांना पांढरकवडा येथील गो शाळेत पाठविण्यात
आले. ट्रक चालक व त्याच्या सोबत असलेले सहकारी त्या ठिकाणावरुन पसार झाले. या
घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक
सरळ करून त्या मधील जनावरांनाबाहेर काढून
त्याना जिवदान दिले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नरसाळे हे करीत
आहे.
0 Comments