यवतमाळ : पिस्टल व काडतूस घेवून रोडवर थांबून असलेल्या युवकाला पोलिसांनी
ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्टल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने १७ जानेवारी रोजी खंडाळा फाटा येथे करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय
पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. सा, पोलीस निरीक्षक
सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, पोलीस हवालदार सुभाष जाधव, पोलीस हवालदार कुणाल
मुंडोकार, पोलीस हवालदार रमेश राठोड, पोलीस शिपायी सुनिल पंडागळे, चा.पो.उप.नि. रविंद्र श्रीरामे यांनी केली.
0 Comments