कार अपघातात अभियंत्याचा मृत्यू ; पाच दिवसापासून सुरु होती मृत्यूशी झुंज

यवतमाळ : कार अपघातात अभियंता गंभीर जखमी होवून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर आज पाच दिवसानंतर त्याची प्राणज्योत मावळली. बाभुळगाव तालुक्यातील विरखेड फाट्याजवळ हा अपघात झाला होता. या घटनेने अंतरगावसह बाभुळगाव पंचायत समितीत शोककळा पसरली आहे.
  • आकाश राजेंद्र बिडकर, वय २६ वर्ष, रा. अंतरगाव असे मृतकाचे नाव आहे. बाभुळगाव पंचायत समिती मधील घरकुल विभागात कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत होते. दिनांक ११ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या एम एच ४९ यु १५६९ क्रमांकाच्या कारने धामणगाव येथुन अंतरगाव येथे येत होते. अशातच विरखेड फाट्याजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की, कारचा पुर्ण चेकनाचुर झाली आहे.  या अपघातात आकाश बिडकर याच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे यवतमाळ येथील खाजगी हॉस्पिटमध्ये भरती करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना नागपुर येथील न्युरोन हॉस्पिटलमध्ये भरती केले. गेल्या पाच दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होता. १६ जानेवारी रोजी दुपारी त्याचा मृत्यु झाला. त्याचे मागे आई-वडील, बहिन असा परीवार आहे. आकाश बिडकर यांच्यावर उपचार करण्यासाठी पंचायत समितीमधील सहकारी, सरपंच संघटना व गावातील नागरिकांनी एक लाख रुपये जमा करुन पाठविले होते.

पालकमंत्र्यानी केला होता सत्कार

सन २०२४ मध्ये बाभुळगाव पंचायत समितीत घरकुल योजनेसाठी पालकमंत्री महोदयाच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. अभियंता आकाश बिडकरने पंचायत समितीला गौरव मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बिडकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

 

Post a Comment

0 Comments