ब्रेकींग : भूमापकास लाच घेतांना रंगेहात पकडले

 मिळकत पत्रीकेवरील नाव कमी करण्यासाठी घेतले दहा हजार

यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील परिक्षण भूमापकास लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राळेगाव येथे आज ६ जानेवारी २०२५ रोजी ही कारवाई केली.

अजय नारायण देशमुख, वय ५० वर्ष, पद परीरक्षण भूमापक, वर्ग ३. नेमणुक उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, राळेगाव असे लाच स्विकारणा-यांचे नाव आहे. तक्रारदार यांनी दि. जानेवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक अजय नारायण देशमुख, वय ५० वर्ष, पद परीरक्षण भूमापक, वर्ग ३, नेमणुक उपअधीक्षक भूमी अभिलेख, राळेगाव यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तकार दिली होती. त्यावरुन एसीबीच्या पथकाने दि. जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली होती. यामध्ये देशमुख यांनी स्वतः करीता तक्रारदार यांना यांचे वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील तकारदार यांचे मयत झालेल्या आईचे नाव मिळकत पत्रीकेवरून कमी करण्याकरीता १० हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते.

आज रचला सापळा

तक्रारदाराकडून लाच घेण्याचे मान्य केल्यानंतर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. जानेवारी रोजी सापळा रचला. या कार्यवाही दरम्यान अजय देशमुख यांनी १० हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने देशमुख यांना लाच घेतांना रंगेहात पकडले. असून, पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू आहे.

कारवाई करणारे पथक

सदरची कार्यवाही मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, अतुल मते, अब्दुल वसीम, सचीन भोयर, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई, संजय कांबळे यांनी केली.

लाच मागीत्यास संपर्क साधा

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फ्रि कमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप-अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केले आहे.

 

 

Post a Comment

0 Comments