ट्रकने ब्रेक मारले : एसटी बसचा अपघात होवून प्रवासी जखमी


यवतमाळ : ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने ड्रायव्हर साईटचा बसचा भाग ट्रकला लागला. त्यामुळे अनेक प्रवासी किरकोळ झाले आहे. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राळेगाव पासून दोन किमी अंतरावर कापशी बायपासवर घडली.

बस चालक सदानंद टेकाम, संगीता शिवरकर, संतोष नांने, आनंदा तागडे, अथर्व पालेकर, सुभाष भोंगे, वाहक अमित राऊत यांच्यासह अनेक प्रवासी जखमी झाले. राळेगाव आगाराची एम एच 40 एन 89 28 क्रमांकांची बस नागपूर वरून राळेगाव कडे येत होती. या बसमधून 25 प्रवसी प्रवास करीत होते. दोन किमी अंतराव राळेगाव असतानाच कापशी बायपासवर समोर जात असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे बस चालकाकडील भाग ट्रकला लागला. त्यामुळे बस चालक सदानंद टेकाम यांच्या डोक्याला व हाताला मार लागला. वाहक अमित राउत व अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना राळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी राणे, आगार व्यवस्थापक बोकडे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आगार व्यवस्थापक बोकडे यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

 

Post a Comment

0 Comments