आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे
प्रतिपादन
श्रमीक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार
दिन
यवतमाळ : स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्यानंतरची पत्रकारांची
भूमिका समाजाला न्याय देणारी होती. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले
आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहेलेल्या संविधानाचे
मुल्य राखून सामान्य माणसाचे हक्क व अधिकार अबाधित राखण्याचे काम पत्रकारांनी
केले आहे असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.
डॉ. अशोक उईके यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राउत, सचिव अमोल ढोणे विचारपीठावर उपस्थित होते. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले. मराठी भाषेतील पहिले दर्पन हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले. पहिला अंक 6 जानेवारीला निघाल्याने राज्यात शासनाने हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला. यावेळी बोलतांना मंत्री उईके यांनी जिल्ह्यातील पत्रकारांसोबत असलेल्या आपल्या ऋणानुबंधावरही भाष्य केले. लेखणीच्या माध्यमातून संविधानातील अधिकार व हक्क सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. मला सर्वच पत्रकारांबद्दल आदर असल्याचेही उईके म्हणाले. कार्यक्रमाचे अतिथी तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही आपल्या भाषणातून जिल्ह्यातील पत्रकारांची भूमिका नेहमी सहकार्याची राहत असल्याचे भाष्य केले. तर जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे यांनी पत्रकारीतेच्या बदलत्या संदर्भावर भाष्य केले. एखादी बातमी सुटल्याची खंत वाटणे हे पत्रकारीता जिवंत असल्याचे लक्षण होय, असे ते म्हणाले. कुणासोबत कसेही संबंध असले तरी पत्रकाराने सत्य मांडले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून श्रमीक पत्रकारसंघाची भूमिका अध्यक्ष श्रीकांत राउत यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन केशव सवळकर यांनी केले. तर आभार सुरेंद्र राउत यांनी मानले.
या कार्यक्रमाला पत्रकार दिनेश गंधे, गणेश बयास, नितीन पखाले, राजकुमार भितकर, नितीन भागवते, अविनाश साबापूरे, विवेक गावंडे, विवेक कवठेकर, नागेश गोरख, गणेश राउत, मेहमुद नाथानी, रुघुवीरसिंह चव्हाण, विरेंद्र चौबे, चेतन देशमुख, रुपेश उत्तरवार, प्रविण देशमुख, अमोल शिंदे, किशोर जुनुनकर, प्रा. विवेक विश्वरुपे, दिपक शास्त्री, संजय सावरकर, श्याम वाढई, तुषार देशमुख, मनिष जामदळ, अतुल राउत, सुधीर मानकर, लक्ष्मणलाल खत्री, विवेक वानखेडे, जयंत राठोड, संजय राठोड, नितीन भुसरेड्डी, राहूल वासनिक, विजय बुंदेला, अनिकेत कावळे, मकसूद अली, सय्यद मतीन सय्यद मुनाफ, रवीश वाघ, गौतम गायकवाड, नितीन राउत, श्याम आरगुलवार आदी उपस्थित होते.
0 Comments