एसटीच्या दरवाढीचे जिल्ह्यात पडसाद : चक्काजाम आंदोलन

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भाडेवाढ जाहिर केली आहे. या दरवाढीच्या विरोधात उबाठा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करुन सरकारचा निषेध केला. यवतमाळ येथील बसस्थानकावर चक्काजाम आदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील नेर, दारव्हा यासह अन्य तालुक्यातही आंदोलन करण्यात आले.  

एस टी महामंडळाच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेना गटाकडून यवतमाळच्या बस स्थानकात चक्काजाम आंदोलन. एसटी महामंडळाच्या दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेना गटाकडून यवतमाळच्या बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. संजय देशमुख यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक काही का हक्क झाली होती कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

नेर येथे चक्काजाम

नेर : शहरातील बस स्थानकासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दरवाढीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. महागाई व दरवाढीमुळे सामान्य जनतेचे हाल होत असल्याचा आरोप करत, हे सरकार गरिबांच्या विरोधात कार्यरत असल्याचे वक्तव्य करण्यात आले. आंदोलना दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. कार्यकर्त्यांनी त्वरित दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. अशा आंदोलनांद्वारे सरकारला सामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात नितीन माकोडे, खुशाल मिसाळ, रवीपाल, गंदे महाराज, प्रमोद राणे, दिलीप माहुरे, चंद्रकांत तनमने, संकेत ठाकरे. गोपाल चव्हाण, अशोक फुलझेले, बंडू  देशमुख, पुंडलिक तंबाखे, सत्यविजय गुल्हान, खडसे, ज्ञानेश्वर भांडे, विनोद रंगारी, माया राणे, वंदना उके, वंदना मिसळे, सुधाकर सरोदे, शिवाजी शेंडगे, सुधीर काळे, राजकिरण राठोड, रवी काळे, अर्जुन राठोड, रफुद्दीन भाई, सुभाष खरडकर, सुरेश बघमारे, देवदास मिसळे, अतुल काळे, राहुल गुल्हाने, गणेश ठाकरे, अभिषेक घुगे, जयश झोड, अनिल उमेश राऊत, यादव कवासे सहभागी झाले होते.

.

एसटी भाडेवाढी विरोधात जनआंदोलन

दारव्हा : बसस्थानक दारव्हा येथे शिवसेना ठाकरे गटाचे वतीने २८ जानेवारीला सकाळी एसटी भाडे दरवाढ रद्द करा अशा घोषणा देत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

गोरगरीब प्रवाशांना प्रवासासाठी एसटी हा एकमेव पर्याय असुन शासनाने केलेल्या दरवाढीमुळे प्रवासी जनतेत प्रचंड असंतोष आहे. "बहुत हुयी महंगाई की मार" म्हणत महागाई पासुन सुटका देण्याचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेची फसगत करुन सर्व क्षेत्रात जीवघेणी भाववाढ केलेली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे जगणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन,कापुस,तुर किंवा कुठल्याच शेतमालास भाववाढ मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झालेले आहेत. महागाईने त्रस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी, नागरीकांना एसटी भाडे दरवाढ परवडणारी नसुन मान्य नाही. अशा संतप्त भावना व्यक्त करत एसटी भाडे दरवाढ रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधीकाऱ्यांकडून काही काळ एसटी बसस्थानक दारव्हा समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व अजय गाडगे तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे गट यांनी केले. आंदोलनात तालुक्यातील समस्त शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तथा प्रवासी सहभागी होते.

Post a Comment

0 Comments