आंबेडकरी चळवळीचे नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे यांना आदरांजली

यवतमाळ - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते नामांतरवीर तथा रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) चे  राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचे गेल्या २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना आज यवतमाळ येथील शासकीय विश्राम भवनात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचे वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परभणी येथील पँथरचे ज्येष्ठ  कार्यकर्ते विजय वाकोडे, पोलीसांच्या मारहाणीत मृत्यु पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानी पँथरचे कार्यकर्ते गोविंद मेश्राम हे होते. यावेळी उपस्थित सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच परभणीचे विजय वाकोडे व शहीद सोमनाथ सूर्यवंशी  यांच्याप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष संजय बोरकर, बिरसा क्रांती दलाचे  संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, पत्रकार पद्माकर घायवान, समता पर्व प्रतिष्ठानच्या प्रमोदिनी रामटेके, वकील संघाचे अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. धनंजय मानकर, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र कांबळे, संदेश ढोले, रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे कृष्णानंद परिपगार, सत्यशोधक समाज संघटनेचे डॉ.दिलीप घावडे, समता सैनिक दलाचे सुनिल बोरकर, डॉ. राजेश जांभुळकर, दारुबंदी आंदोलनाचे उमेश मेश्राम, संगीता पवार, सामाजिक कार्यकर्ते आनंद भगत, बाळासाहेब जीवने, अशोक शेंडे, संजय ढोले, प्रसन्ना बोरकर, विठल नागतोडे, यशवंत अंबुलकर आदी उपस्थित होते. संचालन पत्रकार पद्माकर घायवान यांनी केले. प्रास्ताविक संजय बोरकर यांनी केले. तर  आभार उमेश मेश्राम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments