भाजी विक्रेत्यांची दुकाने हटविली

आठवडी बाजारात दिली पर्यायी जागा ; शहरातील चौकांनी घेतला मोकळा श्‍वास !

यवतमाळ : शहरातील जाजु चौक ते शनी मंदिर चौक, जाजु चौक ते तहसील चौक या मार्गावर सतत वर्दळ राहते. यामुळे सदर मार्गावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. या मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने नगर परिषद प्रशासन व वाहतूक पोलिसांनी सदर भागातील भाजी विक्रेत्यांची दुकाने हटविली असून, त्यांना आठवडी बाजारात पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे जाजु चौक व शनि मंदिर चौकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. त्यामुळे हे दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने येथील रहदारी सुरळीत होणार आहे.

समाजाभिमुख दृष्टीकोण जपावा

अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळे केलेले हे रस्ते रहदारीकरीता सुरळीत राहावेत हा दृष्टिकोन जपण्यासाठी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच विक्रेत्यांचे मनोबल वाढवण्यासाठी  रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी न करता फळ व भाजी  प्रत्यक्ष आठवडी बाजारात जाऊन खरेदी केल्यास कोणताही फळ व भाजी विक्रेता या रस्त्यावर येऊन दुकानदारी थाटनार नाही. विक्रेते व नागरिक आणि ग्राहकांनी मिळुन समाजाभिमुख दृष्टिकोन जपावा असे आवाहन मुख्याधिकारी न.प. यवतमाळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments