शेतक-यांनी दिले माजी मंत्री विजय वडेट्टीवारांना निवेदन

 शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधा 

यवतमाळ : पांढर सोन पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव नाही. सिंचनाची सोय, पिक विमा यासह अनेक समस्यांनी शेतकरी वैतागला आहे. शेतक-यांच्या समस्या शासन दरबारी मांडून, लक्ष वेधावे अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले.  नाफेड आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) च्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना माल विक्री करताना त्रास सहन करावा लागत आहे. टिपेश्वर अभयारण्य परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे आहे. महायुती सरकारने कर्जमाफीच्या वचनाचा भंग केला आहे. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना वगळण्यात आले. एक रुपयात पीक विमा योजनेचा फज्जा उडाला आहे. शेतक-यांच्या समस्या शासन दरबारी मांडाव्या अशी मागणी शेतक-यांनीक केली आहे. या बाबतचे निवेदन माजी विरोधी पक्षनेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांना दिले. यावेळी कॉम्रेड सचिन मनवर, कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे, बिरसा ब्रिगेडच्या विद्या परचाके, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments