अखेर मुख्यसुत्रधार संचालकांसह चौघांना ठोकल्या बेड्या

 ‘जनसंघर्ष’त ४७ कोटींचा घोटाळा : पुणे लोणावळा येथून केली अटक

यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस येथील जनसंघर्ष निधी लि. च्या सात  शाखेत ४७ कोटींचा घोटाळा झाल्याचे उजागर झाले आहे. या घोटाळ्यात प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे (वय -७०), संचालक प्रणित देवानंद मोरे (वय -३२), प्रीतम देवानंद मोरे (वय -३५), जयश्री देवानंद मोरे (वय - ५५), उपाध्यक्ष साहिल अनिल जयस्वाल (वय - ३५) , अनिल रामनारायन जयस्वाल (वय - ६०) पुष्पा अनिल जयस्वाल (वय - ५५) यांना आरोपीं करण्यात आले होते. दरम्यान दि. ३ जानेवारी २०२५ रोजी या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना नागपूर येथून अटक केली होती. मात्र मुख्यसुत्रधार संचालक प्रणित देवानंद मोरे, अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे, जयश्री देवानंद मोरे फरार होते. काल मंगळवारी १४ जानेवारी रोजी पुणे लोणावळा येथे बेड्या ठोकल्या.

३६ दिवसांनी आरोपी गवसले

दिग्रस पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस मुख्यसुत्रधाराच्या मागावर होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवुन तब्बल ३६ दिवसानंतर दि. १४ जानेवारी रोजी पुणे, लोणावळा येथून मुख्यसुत्रधारासह चार जणांना अटक केली. सदर आरोपींना दिग्रस पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

पोलीस ठाण्या समोर ठेविदारांची गर्दी

जनसंधर्ष निधीच्या मुख्यसुत्रधारासह चार जणांना अटक केल्याची खबर दिग्रस शहरात वा-यासारखी पसरली आहे. त्यामुळे ठेविदारांसह नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर एकच गर्दी केली आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्ठीकोणातून ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशन समोरील गेटला बॅरिगेट लावले आहे.

 

Post a Comment

0 Comments