विदर्भातील कार्याची पुण्यनगरीत दखल : डॉ. स्वानंद पुंड यांच्या कार्याचा गौरव

नागपूर : " स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ! " असे संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ आहे राजा म्हणजे कोणत्याही प्रकारचा सत्ताधीश त्याच्या सत्ता क्षेत्रा पुरताच पूजनीय,आदरणीय ठरतो. पण विद्वानांच्या बाबतीत अर्थात ज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ही मर्यादा लागू होत नाही. याच नियमाचा नवीन प्रत्यय म्हणजे वणी सारख्या सुदूर आदिवासी बहुलक्षेत्रात कार्य करणाऱ्या, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचा पुण्यनगरीत होत असलेला वैभवशाली सन्मान.

देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे या विविध मंदिरांच्या समूहांचे संचालन करणाऱ्या व्यवस्थापक मंडळाकडून प्रतिवर्षी धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक पुरस्कार प्रदान केला जातो. गाणपत्य सांप्रदाय आणि संस्कृत साहित्य या दोन्ही विषयांवर पारंपारिक पद्धतीने अर्थात ग्रंथलेखन, लेखमालिका लेखन, प्रवचने याबाबतीत प्रचंड कार्य करण्याच्या सोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून यूट्यूब चैनल सारख्या माध्यमातून जगभरातील हजारो गणेश भक्त आणि संस्कृत प्रेमींना ज्ञानाचा खजिना मुक्त करणाऱ्या डॉ. स्वानंद पुंड यांच्या अत्यंत समाजोपयोगी कार्याचा गौरव स्वरूपात त्यांना या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येत आहे. पुणे येथील भागवताचार्य पू. शरद शास्त्री जोशी यांच्यासह, पुण्यनगरीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त विदूषी डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी सारसबाग मंदिरात त्यांना हा सन्मान प्राप्त होणार आहे.

डॉ. स्वानंद पुंड यांच्या कार्याचा गौरव विदर्भासाठीच अभिमानाचा

स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ! " असे संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ आहे राजा म्हणजे कोणत्याही प्रकारचा सत्ताधीश त्याच्या सत्ता क्षेत्रा पुरताच पूजनीय,आदरणीय ठरतो. पण विद्वानांच्या बाबतीत अर्थात ज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ही मर्यादा लागू होत नाही. याच नियमाचा नवीन प्रत्यय म्हणजे वणी सारख्या सुदूर आदिवासी बहुलक्षेत्रात कार्य करणाऱ्या, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचा पुण्यनगरीत होत असलेला वैभवशाली सन्मान.

देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे या विविध मंदिरांच्या समूहांचे संचालन करणाऱ्या व्यवस्थापक मंडळाकडून प्रतिवर्षी धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक पुरस्कार प्रदान केला जातो. गाणपत्य सांप्रदाय आणि संस्कृत साहित्य या दोन्ही विषयांवर पारंपारिक पद्धतीने अर्थात ग्रंथलेखन, लेखमालिका लेखन, प्रवचने याबाबतीत प्रचंड कार्य करण्याच्या सोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून यूट्यूब चैनल सारख्या माध्यमातून जगभरातील हजारो गणेश भक्त आणि संस्कृत प्रेमींना ज्ञानाचा खजिना मुक्त करणाऱ्या डॉ. स्वानंद पुंड यांच्या अत्यंत समाजोपयोगी कार्याचा गौरव स्वरूपात त्यांना या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येत आहे. पुणे येथील भागवताचार्य पू. शरद शास्त्री जोशी यांच्यासह, पुण्यनगरीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त विदूषी डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी सारसबाग मंदिरात त्यांना हा सन्मान प्राप्त होणार आहे. डॉ. स्वानंद पुंड यांच्या कार्याचा हा गौरव संपूर्ण विदर्भासाठीच अभिमानाचा विषय आहे.

Post a Comment

0 Comments