विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

 


यवतमाळ : बाराव्या वर्गात शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीने स्वत:च्या घरीच गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना पांढरकवडा शहरातील रामनगर परिसरात आज ६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पांढरकवडा शहरात खळबळ उडाली आहे.

साक्षी विनोद पुराणीक वय १९ वर्षं रा. रामनगर पांढरकवडा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. साक्षी ही राजर्षी शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती वर्ग १२ वी (विज्ञान) शिक्षण घेत होती. पांढरकवडा शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या छाया पुराणीक ह्या पांढरकवडा महसुल विभागात कार्यरत आहे. आज सोमवारी दि. ६ जानेवारी रोजी दुपारी १:३० दरम्यान त्यांची लहान मुलगी कु. साक्षी पुराणीक हिने गळफास घेतला. गळफास घेतल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पांढरकवडा पोलीस विभाग करीत आहे.

Post a Comment

0 Comments