यवतमाळ : जिल्ह्याच्या टोकावर असलेला वणी तालुका गौण संपत्तीने नटलेला असून, वणी या शहराला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून परिचीत आहे. तालुक्यातील उकणी कोळसा खाण परिसरात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना आज मंगळवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या वाघाचा नेमका मृत्यू कशाने झाला हे शोधण्याचे आव्हान वनविभागाच्या समोर उभे ठाकले आहे.
उकणी कोळसा खाणीत काम करणा-या मजुरांच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच कोळसा कंपनीचे अधिकारी, कर्मचा-यांनी त्या ठिकाणी धाव घेवून वनविभागाच्या अधिका-यांना माहिती दिली. या घटनेचे गांभिर्य ओळखून वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. सदर वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला याची चौकशी वनविभागाचे अधिकारी करीत आहे.The Menu of this blog is loading..........
0 Comments