प्रवाशांचे खिसे कापणा-या ‘ज्ञानेश्वर’ला ठोकल्या बेड्या

सात गुन्ह्याचा पर्दाफाश, सोन्यासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ : बसस्थानकावर प्रवाशांची पर्स व जेब कट चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. पुसद येथील बसस्थानकावर चोरीच्या उद्देशाने फिरणा-या अट्टल चोरट्या ‘ज्ञानेश्‍वर’ला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी चौकशी करुन सात गुन्हाचा पर्दाफाश केला. सदर चोरट्याकडून सोन्याच्या दागिन्यासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

ज्ञानेश्वर रामभाऊ भिसे वय ४७ वर्ष रा. लाख रायाजी ता. दिग्रस असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस अधिकारी व अंमलदार दि. १८ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आरोपीचा शोध घेत होते. अशातच प्रवाशांची पर्स व जेब कट करुन चोरी करणारा अटटल चोरटा ज्ञानेश्वर भिसे हा पुसद बस स्थानक परिसरात संशयीतरित्या चोरी करण्याच्या उददेशाने फिरत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन पुसद बस स्थानक परिसरात ज्ञानेश्‍वरला जेरबंद केले. त्याचे जवळ २२ ग्रॅम ६२ मिली सोन्याचे दागिणे किंमत १,५८,३४०/- रु , रोख रक्कम १३,५००/- रु असा एकूण १,७१,८४०/- रुचा मुददेमाल जप्त केला.

वर्षभरात केले सात गुन्हे

ज्ञानेश्‍वरला पेलिसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. यामध्ये सन २०२३ ते २०२४ मध्ये पुसद बस स्थानक, उमरखेड बस स्थानक परिसरातील बस मध्ये बसणा-या महीला व पुरुष प्रवाशांचे जेब कट करुन चोरी केली. तसेच ढाणकी येथे बॅकेच्या परिसरात जेब कट करुन चोरी केल्याची कबुली दिली. वर्षभरात तब्बल ७ चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कारवाई करणारे पथक

पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे., पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे यांनी केली.

Post a Comment

0 Comments