कास्ट्राईब कर्मचारी जि.प. अध्यक्षपदी भारत भितकर
यवतमाळ : कास्ट्रार्ईब कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी आनंद भगत यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. तर कास्ट्राईब
कर्मचारी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारत भितकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात
आली. कास्ट्रार्ईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हा
शाखेकडून प्राप्त झालेले मंजूर प्रस्तावानुसार राज्य कास्ट्रार्ईब
कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी आनंद भगत यांची जिल्हा महासंघाचे अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली. तसेच कास्ट्रार्ईब जिल्हा परिषद यवतमाळ अध्यक्षपदी भारत भितकर यांची पुनर्नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या विविध शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष, सचिव, सदस्य तथा नामदेव स्थूल, शितल कुमार वानखेडे, सुभाष मनवर, अशोक भगत, हरीश रामटेक, वनमाला राऊत, सुनील मालके, सुनील वनकर, प्रफुल मनवर, विनोद कांबळे, मनोज भगत, अविनाश वाकोडे, अनिल डोंगरे, अतुल ईडपाते, आनंद कांबळे, अनिल मनवर, अतुल पेटकर, अरुण बनसोडे, प्रशांत भगत, सुरेश भितकर, देवानंद बेले, उमेश अनाके व
इतर तालुक्यातील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments