यवतमाळ : एसपी कुमांर चिंता यांच्या संकल्पनेतून पोलीस व जनता यांच्यात संबंध वृददीगंत करण्याकरीता पोलीस समन्वय राबविण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रस्थान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ११ लाखांचा मुददेमाल वाटप करण्यात आला.
पो. स्टे. यवतमाळ शहर येथे अप क्र. ३०५/२०२४ कलम ४१९, ४२०, ३४ भादवि सहकलम ६६ (ड) IT ACT मधील तक्रार दार यांची फसवणूकीची रक्कम ३,००,०००/- रुपये नगदी आरोपी कडून जप्त करण्यात आली. तसचे अप क्र. १०८४/२०२४ कलम ३०३(२) भा न्या सं मधील तक्रारदार यांची अॅक्टीव्हा मोपेड वाहन चांदणी चौक यवतमाळ येथुन चोरी गेली. दोन्ही तक्रारदार यांना न्यायालयाच्या आदेशान्वये परत करण्यात आली. पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्या बाबत तक्रार दिलेली होती. तक्रारदार यांचे मोबाईलचा शोध CEIR पोर्टलचा पोलीस स्टेशन यवतमाळ शहर स्तरावर वापर करुन शोध घेण्यात आला. त्यामध्ये एकुण ५० मोबाईल किंमत अंदाजे ७,६४,६२१/- रुपयांचा मुददेमाल तक्रारदार यांना पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे सा यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवतमाळ शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, परी पो.उप.नि. संतोष भाट, पोलीस अंमलदार रविंद्र नेवारे, अंकुश फेंडर, राजकुमार कांबळे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षक मध्ये पो. स्टे. ला नेमणुकीस असलेले श्रेयष कोल्हे, रोषन आमनेरकर, उमेश आडे यांनी केली.
0 Comments