एका आरोपीस अटक : एक डॉक्टरही ताब्यात
दारव्हा शहरात्तील नवजात अर्भक प्रकरणी दारव्हा पोलीसांनी दि. ५ जानेवारी रोजी अज्ञात आरोपी विरूध्द
गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा तात्काळ उघडकिस आणणे बाबत निर्देश कुमार चिंता यांनी
दारव्हा पेलीसांना दिले होते या वरून ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी आपली संपुर्ण यंत्रणा
व खबरे कामी लावले होते. गेल्या २४ तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा
उलगडा केला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, सहा. पोलीस अधिक्षक
दारव्हा चिलुमुला रजनिकांत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी,
सपोनि सपोनि दिनेश गावंडे, पोकॉ. पंकज राठोड,
विजय फोपसे विलास राठोड, सुरेश राठोड हे करीत आहेत.
दहा महिन्यापासून प्रेमसबंध
दि. ६ जानेवारी रोजी गुप्त माहीतीच्या आधारे
दारव्हा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन बालीकेस
पोलीस स्टेशन ला आणुन तीला विश्वासात घेवुन विचारपुस केली. या
संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पिडीत बालीका ही दारव्हा शहरात
एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. ती दररोज
बस ने येजा करीत असे सुमारे १० महिण्यापुर्वी तीची आकाश राठोड याचेशी ओळख
झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातुन दोघांन
मध्ये शारीरीक संबंध प्रस्तापीत होवून पिडीतेस गर्भधारणा झाली.
याबातची माहिती मात्र आरोपी आकाश राठोड यास दिली.
गर्भपाताच्या घेतल्या गोळ्या
आरोपी आकाश राठोड व त्याचा वाहन
मालक विलास राठोड यांनी शुकवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पिडीतेस गर्भपाताच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या. शुकवारी
रात्री पिडीतेने त्या गोळया सेवन केल्या केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी सकाळी तीला असाहय वेधना होवु लागल्याणे तीच्या आई वडीलांनी तीला दारव्हा
शहरातील एका डॉक्टरकडे तपासणी साठी नेले. त्या डॉक्टरने पिडीत तरुणीला तपासणी करून तीला उपचार कामी इतरत्र घेवुन
जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याच वेळेस दवाखाण्या जवळच पिडीतेची
प्रस्तृती होवुन तीने एका मृत बाळाला जन्म दिला. भिती पोटी तीने ते मृत नवजात अर्भक तेथे असलेल्या नालीत फेकुन दिले.
आरोपीस अटक, डॉक्टरही ताब्यात
पोलीसांनी आरोपी विलास मदन राठोड यास काल रात्रीच अटक केली. तसेच चौकशी कामी त्या डॉक्टरला देखील ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयात हजर करुन १० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. सदर गुन्हयात पोलीसांनी भादवि कलम ३७६ (२), (एन) सह कलम पोस्को कलम ४, ६, २१ ही वाढीव कलमे समाविष्ठ केले आहे. दारव्हा पोलीस इतर आरोपींचा कसुन शोध घेत आहे.
मुख्य आरोपी फरार
या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश राठोड हा फरार झाला आहे. दारव्हा पोलीस सदर
आरोपीच्या मागावर असल्याची माहिती दारव्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास कुळकर्णी
यांनी दिली.
0 Comments