मॅरेथॉन मध्ये किती रनर्स सहभागी होणार !

४०० व्हॅलिटीअर, डॉक्टर उपस्थित राहणार
यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन २०२५

यवतमाळ : धकाधकीचे जिवन जगतांना आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना सुदृढ आरोग्याचे महत्व पटवुन देणे व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे उद्देशाने ‘यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये यावर्षी २५०० रनर्स सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 

गेल्या तीन वर्षापासून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी रनर्सची संख्या वाढत आहे. गट २१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी पॉवर रन, ५ किमी फिटनेस रन, ५ किमी चिल्ड्रन्स रन आणि ३ किमी फॅमिली फन रन उपलब्ध आहेत. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीला खास टी-शर्ट, बिब, टाइमिंग चिप, हायड्रेशन स्टेशन्स, वैद्यकीय सहाय्य, फिजिओथेरेपी सुविधा, मिडल, ई-सर्टिफिकेट आणि फ़्री रेस देण्यात येणार आहेत. ५ जानेवारी रोजी नेहरू स्टेडियम, यवतमाळ येथे होणार आहे. तसेच ज्यांना या स्पर्धत सहभागी व्हायचे आहे त्यांना स्टॉपवरही नोंदणी करता येणार आहे. शारीरिक शिक्षक संघटना, अ‍ॅथलेटिक्स संघटना, आयएमए जिल्हा पोलिस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आयडीए संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, फिजिओथेरपिस्ट संघटना आणि श्रमिक पत्रकार संघ यांचा सक्रिय सहभाग असणार आहे अशी माहिती कॉटन सिटी हेल्थ फाउंडेशनचे डॉ. परेश गंढेचा, अपर जिल्हाधिकारी ललित व-हाडे यांनी दिली.

 

 

Post a Comment

0 Comments