गांजाची विक्री करणा-या इसमास अटक : एनडीपीएस अंतर्गत कारवाई

 


यवतमाळ : शेतातील झोपडीत गांजा ठेवून विक्री करणा-या इसमास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4 किलो 637 ग्रॅम गांजा, मोबाईल, विक्रीचे साहीत्य असा एकूण 1,03,360/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुसद शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.

गुलजमान ऊर्फ भु-या खान अलीयार खान वय 45 वर्ष रा. गढीवार्ड पुसद असे आरोपीचे नाव आहे. दिनांक 14 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर हददीतील के डी जाधव तांडा शेजारी शेतशिवारात शेतातील असलेल्या झोपडीमध्ये गुलजमान ऊर्फ भु-या खान हा गांजा अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने के डी जाधव तांडा शेत यिवारातील झोपडीमध्ये धाड टाकली. त्या ठिकाणावरुन गुलजमान ऊर्फ भु-या खान अलीयार खान यास ताब्यात घेतले. त्याचे झोपडीतून 4 किलो 637 ग्रॅम गांजा, मोबाईल, विक्रीचे साहीत्यासह एकूण किंमत 1,03,360/- रु चा मुददेमाल जप्त केला. याप्रकरणी अमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8(c), 20(b), (B) अन्वये अपराध क्रमांक 13/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा दाखल केला.

माहिती देण्याचे आवाहन

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी जे, पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस स्टेशन पुसद शहर, यांचे मार्गदर्शनात एलसीबीचे पोउपनि शरद लोहकरे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, तसेच पुसद शहर पोलीस स्टेशन पोहवा दिनेश सोळंखे, चापोहवा विनोद सरकुडे यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments