संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्टॅंडिंग समितीची बैठक, नुटाच्या शिलेदाराची अविरोध निवड

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विविध प्राधिकरणावर नुटाचे वर्चस्व



यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या स्टॅंडिंग समितीच्या बैठकीमध्ये नुटा संघटनेचे शिरेदारांची विविध विषयाच्या अभ्यास मंडळ आणि अकॅडमी कौन्सिल म्हणजेच विद्या परिषदेच्या प्राधिकरणावर अविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये विद्या परिषदेत आंतरविद्या शाखेमधून डॉ.संजय देशमुख यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉ आशिष राऊत,शिवाजी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,अकोला यांची निवड करण्यात आली. डॉ.जीवन पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कला आणि मानव्यविद्या शाखेमधून डॉ गणेश मालटे,शिवाजी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चिखली यांची विद्या परिषदेवर निवड करण्यात आलेली आहे.

भौतिकशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळातून डॉ. अजय लाड यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉ सुयोग मानकर, शिवाजीराव मोघे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, केळापूर (पांढरकवडा) यांची निवड करण्यात आली आणि समाजकार्य अभ्यास मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर डॉ.अनिल विजयराव देशमुख,महात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांची निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुटा संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी यांचे नेतृत्वाला यशाचे श्रेय दिले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर नुटा संघटनेचा २०२२ मध्ये झालेल्या सिनेट आणि विद्या शाखेच्या निवडणुकीमध्ये ८० टक्के जागा प्राप्त करून निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केलेला होता, तो आलेख सातत्याने वाढत आहे.

या प्रसंगी नुटा संघटनेचे सिनेट सदस्य डॉ.प्रशांत विघे,डॉ. सुभाष गावंडे, , प्राचार्य डॉ देवेंद गावंडे ,डॉ.नितीन टाले, डॉ. नितीन चांगले, डॉ. रवींद्र मुंद्रे, प्राचार्य डॉ.सुभाष गवई, डॉ.संतोष बनसोड, कैलास चव्हाण अमोल देशमुख डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. महेंद्र मेटे,डॉ.सावन देशमुख यांनी निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments