चिकणी डो. येथील झेड.पी. शाळेच्या विद्यार्थ्यांची उंच भरारी
नेर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा चिकणी डोमगा
येथील सहाव्या वर्गातील तीन विद्यार्थी विमानवारीसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यातून सहाच्या वर्गातून प्रथम येणाचा मान
शाळेतील आयुष मनोज गोगटे या विद्यार्थ्याला प्राप्त झाला. तर
विश्व सुग्रीव बांबोर्डे, भावेश रविंद्र माहूरे
विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जि.प.उच्च प्राथमिक मराठी शाळा चिकणी डोमगा येथील मुख्याध्यापक
वैद्य, शिक्षीका बोंदरे वैद्य, शिक्षक प्रभुचरण कोल्हे यांनी मेहनत घेवून महादिप
या स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेतली. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी महादिप मध्ये आलेख वाढला असून, हे यश प्राप्त
झाले आहे.
विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सत्कार
डायटचे अधिव्याख्याता वायवळ, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, शालेय
पोषण आहार अधिक्षिका वंदना नाईक, महादिपचे तालुका समन्वयक गणेश मेंढे, बिआरसीचे विशेष
शिक्षक राहूल वरठी या मान्यवरांनी शाळेत भेट दिली. त्यांनर विमाणवारी साठी
पात्र ठरलेल्या आयुष मनोज गोगटे, विश्व
सुग्रीव बांबोर्डे, भावेश रविंद्र माहूरे यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार केला. तसेच विद्यार्थ्यांना पेन वहीचे वाटप केले.
0 Comments