दिग्रस (यवतमाळ) : प्रभारी मुख्याध्यापकाने सहा वर्षीय विद्यार्थीनीसोबत
अश्लिल चाळे केल्याची संताप जनक घटना दिग्रस शहरातील नगर परिषद शाळेत घडली.
याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी नराधमास जेरबंद केले.
विशाल विजयकुमार कुलकर्णी वय-४३ वर्ष रा. कृष्णभूमी मानोरा रोड दिग्रस
असे प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. कुळकर्णी नगर परिषद शाळेत
मागील २० वर्षांपासून सेवेत आहे. शास्त्री
नगर येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. सदर शाळेत चौथ्या वर्गापर्यंत वर्ग
असून, ३८ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. दि. २९ जानेवारी रोजी
सायंकाळी मुख्याध्यापकाने चिमुकली सोबत अश्लिल चाळे
केले. या प्रकराने मुलगी भयभित झाल्याने मुलीने दुस-या दिवशी शाळेत जाण्यास नकार
दिला. यावेळी आई- वडीलांनी तीला विचारणा केली असता हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर
दिग्रस पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी विशाल विजयकुमार
कुलकर्णी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती दिग्रस शहरात पसरताच सहकारी शिक्षक आणि अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी
दिग्रस पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. घटनेनंतर पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण
झाले होते. आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार
सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसंजीत जाधव, सुजित जाधव, सहकारी करत आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments