तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई
शुभम दादाराव चव्हाण वय १९ वर्षे रा. गजानन
नगर, पिंपळगाव, यवतमाळ
असे आरोपीचे नाव आहे. घरफोडी करण्यात दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. दिपाली सुनिल देवकते वय २९ वर्षे रा. चिरडे
ले-आऊट नेर असे फिर्यादीचे नाव आहे. १८ जानेवारी रोजी त्या घराला कुलूप लावुन दवाखाण्याचे कामा निमीत्य बाहेर गेल्या होत्या.
अशातच अज्ञात चोरट्यांनी त्याचे बंद घराचे कुलूप तोडुन कपाटातील नगदी
८ हजार रुपये, सोण्याचे दागीणे व एक
स्मार्ट वॉच असा एकुण १ लाख ६ हजार ७९९ रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी पोलीस ठाणे नेर येथे
गुन्हा दाखल करण्यात आला. २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारावरुन आरोपी शुभम चव्हाण
यास ताब्यात घेतले. शुभम चव्हाण याची
सखोल चौकशी केली असता दोन विधी
संघर्षग्रस्त बालकांन सोबत घेवून नेर हद्दीतील
बंद घराचे कुलूप तोडुन घरातुन रोख, सोण्याचे दागीणे
व एक स्मार्ट वॉच चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून
स्मार्ट वॉच, दागिणे, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण २ लाख ८२ हजार
१४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे नेर यांचे ताब्यात देण्यात
आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक
पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा चिलूमुला रजनिकांत, यांचे मार्गदर्शनात
पोलीस निरीक्षक सतिश चवरे स्था.गु.शा., स.पो.नि. विजय
महाले, पो.उप.नि. गजानन राजमल्लु, पोलीस अंमलदार बबलु चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, अमित कुमरे, गजानन पत्रे, यादवराव जाधव, नरेंद्र सुर्यवंशी
यांनी केली.
0 Comments