स्नेहमिलनातून पत्रकार कुटुंबियांचे ऋणानुबंध घट्ट

श्रमिक पत्रकारसंघाचा स्नेहमिलन सोहळा 
मनोरंजनाच्या खेळ प्रकाराने हास्यांचे फवारे

यवतमाळ : पत्रकारितेचे विश्वच धावपळीचे आहे. वर्षातून मोजक्याच सात-आठ सुट्या पत्रकारांना असतात. उन्हाळा, पावसाळा अन्‌ हिवाळा तिन्ही ऋतूत पत्रकार बातम्यांच्या पाठीमागे धावत असतात. मात्र, पत्रकारदिनाचे औचित्य साधून दरवर्षी श्रमिक पत्रकारसंघ कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा आयोजित करतो. यंदाही 11 जानेवारीला हॉटेल व्हेनिशिअनमध्ये पत्रकारांनी एकत्र येत आपल्या स्नेहमिलनातून एकमेकांप्रतिचे ऋणानुबंध अधिक घट्ट केले. 

महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ संलग्नित जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात  आले होते. कुठल्याही प्रकारची भाषणबाजी न करता, सर्व पत्रकारांचे कुटुंबिय इतकेच नव्हे  तर, कार्यालयात काम करणाऱ्या संगणक चालकांसह मुद्रित शोधक, ऑफिसबॉय, वितरण प्रमुख, जाहीरात प्रमुख या सर्वांचे कुटुंबिय या सोहळ्याला  आवर्जुन उपस्थित होते. नागपुरातील प्रसिद्ध अँकर श्रद्धा यांनी या कार्यक्रमात अधिक गोडवा आणला. प्रत्येक खेळात पत्रकार कुटुंबातील महिला व पुरूषांनी एकमेकांसोबत सहभाग घेतला. एकंदरीत, विचारांचे ओझे या कार्यक्रमात जणू हरविले होते. प्रेम, वात्सल्य, स्नेह, आपुलकी या कार्यक्रमात दिसून आली. प्रत्येकांच्या भावभावनांचे भावबंध यावेळी जुळले होते.  प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसत होती. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, लोकमत समुहाचे किशोर दर्डा, सीमा दर्डा, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, यवतमाळ शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, अवधूतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनीही हजेरी लावली. कार्यक्रमासाठी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव अमोल ढोणे, राज्य कार्यकारिणीतील नागेश गोरख, गणेश राऊत, जेष्ठ पत्रकार न. मा. जोशी,  दिनेश गंधे, गणेश बयास, अशोक गोडंबे, भास्कर मेहरे, नितिन पखाले, प्रा. विवेक विश्वरुपे, विवेक गावंडे, निलेश फाळके, चेतन देशमुख, सुरेंद्र राऊत, रुपेश उत्तरवार, संजय सावरकर,आनंद कसंबे, विरेंद्र चौबे, महेमूद नाथानी, नितीन भागवते, अमोल शिंदे, मयुरेश शर्मा, मयूर वानखेडे, अनिकेत कवळे, नितीन राऊत, अतुल राऊत, मनोज जयस्वाल, रवी राऊत,  नितीन भुसरेड्डी, दिपक शास्त्री, उज्वल सोनटक्के,  विजय बुंदेला, विवेक गोगटे, मनिष जामदळ,  विजयकुमार गाडगे, वासुदेव देशपांडे,  राहूल वासनिक, जयंत राठोड, विवेक वानखडे, वासू भुटानी, शाम अरगुलवार, रोहित देशमुख, मकसूद अली, मतीनभाई, ज्ञानेश्वर ठवकर, विजय मालखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केशव सवळकर यांनी केले.

पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव 

न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी भास्कर मेहरे, तरुण भारतचे समिर मगरे यांना नुकताच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने स्नेहमिलन सोहळ्यात या दोन्ही पत्रकारांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

स्पर्धात्मक खेळांमध्ये मौजमस्ती अन्‌ धमाल

विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक खेळप्रकारात पत्रकार कुटुंबियांनी सहभाग घेतला होता. अँकरने सुचविलेले टास्क पूर्ण करून अनेकांनी बक्षिसेही मिळविली. पत्रकारांसह त्यांच्या सहचारिणी व मुलामुलींनीही या खेळात सहभाग घेतला होता. बक्षिसांमुळे एक नवा हुरुप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमात विजयकुमार गाडगे यांनी प्रसिद्ध शायर इब्ने इंशा यांची गझल आपल्या सुरेल आवाजात सादर केली.

Post a Comment

0 Comments