यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील तीन अधिका-यांच्या नुकत्याच प्रशासकीय
कारणावरुन बदल्या करण्यात आल्या होत्या. आज पुन्हा जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार
चिंता यांनी तीन पोलीस अधिका-यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार
अनिल बेहराणी यांची जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. तर
त्यांच्या रिक्त पदावर पुसद ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांची
तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. पुसद ग्राणिण पोलीस ठाण्याचा चार्ज सहाय्यक पोलीस
निरीक्षक सुरेंद्र राउत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अमरावती परिक्षेत्राचे
विशेष महानिरीक्षकांनी नुकताच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यासह विविध गुन्ह्याचा आढावा
घेतला होता. यामध्ये अनेक गंभीर विषयावर चर्चा रंगली होती. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षकांनी
आज पुन्हा दोन पोलीस अधिका-यांची प्रशासकीय कारणास्तव बदल्याचे आदेश काले आहे.
जिल्हा पोलीस दलात बदल्याचे सत्र सुरु असून, येणा-या काळात पुन्हा पोलीस
अधिका-यांच्या बदल्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
The Menu of this blog is loading..........
0 Comments