आरोपींची संपत्ती जप्त करुन पैसे परत करण्याची मागणी
यवतमाळ : दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमीटेड घोटाळ्यात ६२०० खातेदारांचे ४४ कोटी रुपये अडकलेले आहे. या प्रकरणी
अटक झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करुन खातेदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी जनसंघर्षच्या दारव्हा शाखेशी संबंधीत खातेदार आणि कर्मचाऱ्यांनी
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. ८ जानेवारीला दुपारी
दारव्हा कार्यालयात निवेदन दिले.
पोलिस विभागाकडून आतापर्यंत सात आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात
आलेली आहे. उर्वरित चार आरोपी फरार असुन अजुनपर्यंत त्यांना शोधण्यात पोलिस विभागास
यश आलेले नाही. आरोपींनी गोरगरीब जनतेला अधीक टक्केवारीचे आमीष दाखवत दैनंदिन आवर्ती
,बचत तथा ठेवीद्वारे जमा केलेल्या पैशाची गुंतवणूक कुठे केली ह्याची
चौकशी करणे अभिप्रेत आहे. अटक केलेल्या आरोपींच्या संपत्तीची जप्ती करून ठेवीदारांचे
पैसे परत मिळावेत आणि फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात
करण्यात आलेली आहे. या घोटाळ्यामुळे अनेक जेष्ठ नागरिक, कष्टकरी आणि
सामान्य कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सेवानिवृत्तीचे पैसे, मुलांच्या लग्नासाठीची
बचत आणि दैनंदिन खर्चासाठी ठेवलेल्या रक्कमा अडकल्या आहेत.
0 Comments