चाकुच्या धाकावर फायनांस कंपनीच्या कर्मचा-याला लुटले

 बचत गटाची वसुली करुन परततांना घडली घटना

यवतमाळ : भारत फायनांस कंपनीचा कर्मचारी महिला बचत गटाची वसुली करुन यवतमाळकडे परत येत होता. लखमापुर ते कापरा या गावाच्या दरम्यान तीन जणांनी चाकुच्या धाकावर फायनांस कंपनीच्या कर्मचा-ला अडविले. सदर कर्मचा-यांजवळील २ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल लुटला. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लखमापुर कापरा रोडवर घडली.

संदेश संजय ढोकणे वय २१ रा. दिघी क्रमांक २ ता. बाभूळगाव असे फिर्यादीचे नाव आहे. भारत फायनांस कंपनीत तो कार्यरत असून, त्याच्याकडे महिला बचत गटाच्या वसुलीची जबाबदारी आहे. १६ जानेवारी रोजी ढोकणे लखमापुर येथे वसुलीसाठी गेला होता. या गावात २ लाख ७८ हजार २१९ रुपये वसुल करुन लखमापुर ते कापरा रोडने परत येत होता. अशातच तीन आरोपींनी संगणमत करुन ढोकणे याना अडविले. चाकुच्या धाकावर त्याच्या जवळील पैशाची बॅग जबरीने चोरून नेली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments