यवतमाळ : उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास किंवा मदतीची आवश्यकता असल्यास भाविकांना हेल्पलाईनशु संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुंभमेळा प्रयागराज येथील कंट्रोलरुमचा टोल फ्री क्रमांक 1920 असून दुरध्वनी क्रमांक 0522-2237515 असा आहे. तसेच मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई येथील क्रमांक 022-22027990 तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील दुरध्वनी क्रमांक 07232-240720, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष यवतमाळ 07232-256700 आहे.
प्रयागराज येथे दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार सदर क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 Comments