स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
राकेश दिपक यादव, वय ४० वर्षे रा पवार पुरा यवतमाळ, अनुप महेश जैस्वाल, वय ४० वर्षे, रा बोरले नगर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र व आमंली पदार्थ बाळगणा- या विरुध्द प्रभावी रेड कारवाई करण्यासाठी पथक तयार केले आहे. सदर पथकाला रेड कारवाई करणे बाबत निर्देश देण्यात आले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांने गोपनिय माहितीच्या आधारे यवतमाळ शहरातील शनीमंदीर चौक दक्षता पेट्रोलपंपा जवळील आठवडी बाजारा कडे जाणा-या रोड वर सापळा रचला. त्यानंतर आरोपी राकेश यादव, अनुप जैस्वाल यांची अंग झडती घेतली. त्याच्याकडून ८८.१० ग्राम MD ड्रग्ज किंमती २,६४,३०० रु , एक देशी कटटा, तिन जिवंत काडतुस किंमती ३०,६०० रु, एक मोसा व दोन मोबाईल असा एकुण ३,८४,९०० असा मुददेमाल जप्त केला.
आरोपीला तीन दिवस पिसीआर
या प्रकरणी १०७/२०२५
कलम ८ (क), २१ (क) एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ सह कलम ३/२५ आर्म अॅक्ट, १३५ मपोका अन्वेय
गुन्हा नोंद केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपीतांना तिन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली
आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक
पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात सतिश चावरे पो. नि. स्थागुशा, सपोनि सुगत पुंडगे, पोउपनि गजानन
राजमल्लु, सफौ सय्यद साजीद, बंडु डांगे, योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडावु, रुपेश पाली, योगेश डगवार, रितुराज मेडवे, पोशि सलमान शेख, आकाश सहारे, देवेंद्र होले, चालक यागेश टेकाम
यांनी केली.
0 Comments