‘लाडकी बहीण योजना’ महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी: पालकमंत्री संजय राठोड

 प्रजासत्ताकाचा वर्धापण दिन उत्साहात साजरा

यवतमाळ : राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरु केल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी योजना ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 6 लाख 91 हजार महिलांना प्रती महिना 1 हजार 500 रुपयांचे अर्थिक सहाय्य दिले आहे. बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना देखील मोफत विज पुरवठा केला जात असून अवघ्या काही महिन्यात 191 कोटी रुपयांची विज बील माफी देण्यात आल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

येथील समता मैदानात भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलिस व विविध विभाग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. विविध पुरस्कारांचे वितरण देखील पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रम सादर केले. तंबाखुमुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे व शुभांगी वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments