ना. अशोक उईके चंद्रपूरचे पालकमंत्री
यवतमाळ : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीची एकहाती सत्ता आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेवुन आपल्या पदाची सूत्र हाती घेतली होती. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पुर्व संध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यावेळी नवनिर्वाचित मंत्री यांना गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर बिना खात्याचे मंत्री म्हणुन हिवाळी अधिवेशनात काम पाहिले. त्यानंतर अधिवेशना नंतर मंत्री महोदयांना खाते वाटप करण्यात आले. मात्र पालकमंत्री पदाची निवड रखडली होती. अखेर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. तर ना. अशोक उईके यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले.
जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिदे गटाचे आ. संजय राठोड, भाजपचे प्रा. डॉ अशोक उईके हे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली. जिल्ह्यात तीन लाल दिवे मिळाले आहे. त्यापैकी पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागेल याबाबत चर्चेला पेव फुटले होते. अखेर आज महाराष्ट्र शासनाने पालकमंत्र्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री पदी वर्णी लागली. तर ना. अशोक उईके याच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
0 Comments