आता ‘टेक्निकल ऍनेलिसीस विंग’ करणार गंभीर गुन्ह्याचा तपास

 पोलीस दलाचे कामकाज जलद होणार

यवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर दाखल गंभीर गुंतागुंतीचे व क्लिष्ट स्वरुपाचे गुन्हे जसे दरोडा, चोरी, जबरी चोरी, घरफोडी व इतर गंभीर गुन्हे यांसारख्या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा या हेतुने ‘टेक्निकल ऍनेलिसीस विंग’ स्थापन केली आहे. यामध्ये तांत्रिक पद्धतीने समांतर तपास करुन सदरचे गुन्हे जलदगतीने उघडकीस आणण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधून दि. २६ जानेवारी २०२५ रोजी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ अंतर्गत "तांत्रिक विश्लेषण विभाग" (Technical Analysis Wing) स्थापण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या स्तरावर दाखल होणाऱ्या गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांस जलदगतीने उकल करण्यासंदर्भाने सदर विभाग कामकाज करणार आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे कामकाज अजून अद्ययावत व जलद होणार आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments