‘त्या’ मृत वाघाचे नख व दाताची चोरी, वेकोलीच्या चार कर्मचा-यांना अटक


यवतमाळ : वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाण परिसरात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला होता. ही घटना ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. या वाघाचा मृत्यू कशाने झाला. वाघाची शिकार तर झाली नाही ना यासह विविध पैलुवर वनविभागाच्या पथकाने गुप्त पद्धतीने तपास सुरु केला. ‘त्या’ मृत वाघाचे नख व दात वेकोली कोळसा खाणीतील कर्मचा-यांनी चोरल्याचे उघडकीस आल्याची माहिती तपासात समोर आली. त्यावरुन अमरावती येथील वनविभागाच्या पथकाने कोळसा खाणीतील चार आरोपींना अटक केली. सतीश अशोक मांढरे वय २६ रा. वणी, नागेश विठ्ठल हिरदेवे वय ४० रा. उकणी, आकश नागेश धानोरकर वय २७ रा. वणी, रोशन सुभाष देरकर वय २८ रा. उकणी अशी अटक केलेल्या कर्मचा-यांची नावे आहे. वाघाचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदना नंतर स्पष्ट होणार आहे. वनविभगाच्या अमरावती येथील पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments