यवतमाळ : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार ठार झाला असून,
९ जण जखमी झाले आहे. ही घटना कळंब- राळेगाव मार्गावरील उमरी ते धोत्रा या गावा
दरम्यान सोमवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
संदीप मधुकर मांढरे वय 35 वर्ष रा आष्टा ता राळेगाव असे मृतकाचे नाव
आहे. तर अंकुश नारनवरे वय 40 वर्ष रा आष्टा
हा जखमी असून, त्याच्यावर कळंब येथील रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी
यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तर कारमधील देवेन भंडारी वय 25, आर्यन भंडारी वय 10, तनुजा भंडारी वय 37, सौरभ भंडारी वय 28, जयनिश भंडारी वय 7 वर्ष, नमिता भंडारी वय 30 वर्ष, देवेश भंडारी वय 25 वर्ष, गोविंद गोमसाळे कार चालक वय 40 वर्ष रा सर्व नांदेड हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर कळंब येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार केले
असून, पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. नांदेड
येथील भंडारी कुटुंबीय घरगुती कार्यक्रमासाठी वणी येथे पिवाय
०१/ सि व्ही २२२२
क्रमांकाच्या कारने जात होते. तर मृतक संदिप मांढरे व अंकुश नारनवरे हे आष्टोना येथून कळंबकडे दुचाकीने
जात होते. अशातच कळंब - राळेगाव मार्गावरील उमरी ते धोत्रा दरम्यान कारने दुचाकीला
धडक दिली असून, कार पलटी झाली. या अपघातात दुचाकीस्वार संदीप मांढरे हा ठार झाला.
त्याचासोबतचा अंकुश नारनवरे हा जखमी झाला. तर कारमधील आठ जण जखमी झाले. या घटनेची
माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
0 Comments