निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा दाखल, दारव्हा शहरात खळबळ
यवतमाळ : कुकर्मातून जन्म दिलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला नालीत फेकुन देण्याची घटना दारव्हा शहरात आज ५ जानेवारी रोजी उजेडात आली. सदर अर्भक हे स्त्रि जातीचे असून, ते अनैतिक सबंधातून झाल्याचे असावे अशी चर्चा आहे. एवढेच नाही मुलगी नको या भावानेतून स्त्री जातीचे अर्भक फेकले का असा सवालही उपस्थित होत आहे.आज रविवारी दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी अंबादेवी मंदिर रोड दारव्हा या परिसरात स्त्री जातीचे मृत अर्भक आढहले. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. संदिप सुखलाल कनोजे यांनी या बाबतची माहिती दारव्हा पोलिसांना दिली. त्यावरुन पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. नवजात शिशुचे प्रेत ताब्यात घेवून दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी दारव्हा पोलिसांन त्या निर्दश माते विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहे.उलट सुलट चर्चला उधान
मृत अर्भक स्त्री
जातीचे असून, अनैतिक संबंधातून जन्माला आले अशा चर्चला उधान आले आहे. दारव्हा
पोलिसांनी या निर्दयी माते विरुद्ध गुन्हा दाखल केला अहे. दोषीवर कठोर करवाई
करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
त्या बाळाचे डिएनए होणार
नालीत आढलेले मृतक
अर्भक हे स्त्रि जातीचे असल्याने तीचे आई-वडील कोण हे शोधण्याचे आव्हान
पोलिसांसमोर उभे ढाकले आहे. त्यामुळे या नवजात बाळाचे डिएनए टेस्ट होणार असून, सॅम्पल
घेण्यात आले आहे.
तपास अधिकारी
या प्रकरणाचा तपास पोलीस
अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, सहा. पोलीस अधिक्षक चिमुल्ला
रजनिकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास
कुळकर्णी, एपीआय दिनेश गावंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लावरे, पो.कॉ. पंकज राठोड,
विलास राठोड, विजय फोफसे करीत आहे.
0 Comments