यवतमाळ : दिग्रस येथील बहुचर्चित जन संघर्ष अर्बन निधी बँकेतील
कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणातील मुख्यसुत्रधार
प्रणित मोरे, अध्यक्ष देवानंद मोरे, जयश्री मोरे, प्रीतम मोरे या चौघांना लोणावळा येथील एका
हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि एस आय टी
पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सात जणा विरुद्ध
दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर बॅकेच्या सहा हजार
200 सभासदांची फसवणूक केल्या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
होता. पोलिसांनी 3 जानेवारीला
अनिल जयस्वाल, साहिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल यांना एसआयटी पथकाने अटक केली होती. त्यानंतर
काल देवानंद मोरे सह चौघांना अटक केली. आज चार आरोपींना दारव्हा येथील न्यायालयात हजर केले. प्रीतम मोरे आणि प्रणित मोरे यांना 25 जानेवारी पर्यंत
पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ रामेश्वर वैजने, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
विजय महाले, सोहेल बेग, मिथुन जाधव, किशोर गजभिये, धीरज जानकर, धीरज
राठोड, प्रणाली टेकाम, सीमा भोयर,
पूजा भास्कर यांनी केली.
The Menu of this blog is loading..........
0 Comments