आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके काय म्हणाले

 अंतरगाव येथे पालक मेळावा

यवतमाळ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती संदर्भात ठोस पाऊले उचलण्याच्या दृष्टीने पाउले उचलण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम काम करु असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

कळंब तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंतरगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके बोलत होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, कळंबचे तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी बाहेकर, मुख्याध्यापक विजय क्षीरसागर, अंतरगाव सरपंच गुलबानो मेहंदी भाई कोठडीया, डोंगरखर्डा सरपंच निश्चल ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील करपते, सामाजिक कार्यकर्ते निश्चल गौर, आयटीआयच्या प्रकल्प अधिकारी उषा त्रिपाठी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. डॉ. उईके यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवले.

यावेळी सुहास गाडे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे व पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मार्गदर्शन केले. अंतरगाव आश्रमशाळेतर्फे निर्मित 'दिशा' ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. प्रा. डॉ. उईके यांच्या हस्ते फिल्ममध्ये सहभागी कलाकार व तंत्रज्ञ यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिरसागर यांनी केले. संचलन नीरज जवके यांनी केले. तर आभार प्रफुल गावंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपसरपंच गौरव मडावी, प्रेम आडे, विजय आत्राम, आश्रम शाळेचे धम्मपाल घरडे, किशोर पाटील, सोमेश राऊत, ज्योती नावंदीकर, अधीक्षक सुशील दाढे, अधिक्षिका शुभांगी चव्हाण, प्रणाली सीडाम, आत्राम, नीलिमा गेडाम, राजू लोणकर, भगवंत मेसेवार, चंद्रकला मेश्राम, लक्ष्मण वाढवे, आशिष तायडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments