लाडकी बहीण मॅराथॉन स्पर्धा ; शिवसेनेच्या मॅराथॉन स्पर्धेत १५०० महिला धावल्या
यवतमाळ : शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन उमरखेड शिवसेना पक्षाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जंयती निमित्त रविवार १२ जानेवारी रोजी लाडकी बहीन मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पधेत उमरखेड शहर व परिसरातील 1 हजार 500 महिलांनी सहभाग नोंदवला.
उमरखेड शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमता महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आज सकाळी नऊ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मॅरेथॉन स्पर्धेला शिवसेनेचे नेते डॉ. अंकुश देवसरकर, डॉ. शुभांगी देवसरकर यांचे सह शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षाचा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात केली. स्थानिक शिवाजी महाराज चौकापासून ते पुसद रोड वरील हुतात्मा स्मारकापर्यंत व तेथून परत शिवाजी महाराज चौकापर्यंत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अ गटातून पहिला अर्चना गणेश घुकसे, दुसरा पायल दयाराम जाधव व शिल्पा काळूराम जाधव हीने तिसरा येण्याचा बहुमान मिळवला तर ब गटातून पहिला निकीता नारायण मोरे, दुसरा पुजा बाबुसिग राठोड व सुप्रिया दवणे हीने तिसरा क्रमांकाचा बहुमान मिळवला. या स्पर्धेत अ व ब गटात प्रथम ११ हजार द्वितीय ७ हजार तृतीय ५ हजार असे बक्षीस ठेवण्यात आले होते तसेच स्पर्धेत सहभागी प्रत्येक लाडक्या बहिणीला आयोजका कडून प्रोत्साहन पर साडी देण्यात आली .
यावेळी शिवसेनेचे डॉ अंकुश देवसरकर , डॉ. शुभांगी देवसरकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिरासे संतोष जाधव, रवीकांत रुडे, कैलास कदम, शहर प्रमुख ॲड संजय जाधव , संदीप ठाकरे , महिला शहराध्यक्ष सपना चौधरी , दामोदर इंगोले उपस्थित होते. यावेळी डॉ. शुभांगी देवसरकर , सविताताई कदम, संगीता वानखेडे यासह महिला शिवसैनिक पदाधिकारी यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु गायकवाड यांनी तर आभार ॲड अजय पाईकराव यांनी केले.
0 Comments